मान.फगणसिंह कुलस्ते केंद्रीय राज्यमंत्री व खासदार अशोक नेते यांनी कचारगढ़ यात्रा निमित्ताने गडावर जाऊन देवी देवतांची पुजा अर्चना करुन दर्शन घेतले
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात कचारगढ़ येथे माघ पौर्णिमेला समस्त आदिवासी समाजाचे आराध्य दैवत् समजल्या जाणाऱ्या माँ काली कंकाली कृपार लिंगो, महागोंगो कोयापुनेम महापुजेनिमित्त कचारगढ़ यात्रा भरते.
या निमित्ताने आज दि.२२ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी कचारगढ़ यात्रा निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मान.फगणसिंह कुलस्ते व खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी आदिवासीचे आराध्य दैवत मा काली कंकाली कृपार लिंगो,महागोंगो कोयापूनेम या देवी देवतांची पुजा अर्चना करुन दर्शन घेतले.
याप्रसंगी कचारगढ़ यात्रा समिती च्या मंडळाने मा.फगणसिंह कुलस्ते व खासदार अशोक नेते तसेच लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे यांचे आदिवासी पारंपरिक पद्धतीने डोक्यात तूरा व पुष्पहाराने स्वागत केले.
या अगोदर यात्रा सुरक्षिततेच्या दुष्टीने कचारगढ़ येथे खासदार अशोक नेते यांनी यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांचे गैर सोय होऊ नये यासाठी आढावा बैठक सुद्धा आयोजित केली होती. या कचारगढ़ यात्रा उत्सवादरम्यान दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून भाविक येत असतात. या पाच दिवसात लाखो भाविक कचारगडमध्ये दाखल होतात.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे,शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल,आदिवासीचे नेते शंकरलाल मडावी तसेच मोठ्या संख्येने यात्रा समितीचे सदस्यगण व कार्यकर्ते उपस्थित होते.