गोंडपिपरीत लहान मुलांकरिता स्वतंत्र कोविड कक्ष निर्माण करा
गोंडपिपरी यंग ब्रिगेड ची मागणी
शहर प्रतिनिधी : प्रमोद दुर्गे गोंडपिपरी
गोंडपीपरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. म्रुत्युच्या दरातही वाढ होत आहे.
अश्यातच प्रसार माध्यमाद्वारे दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेत लहान बालकांवर आघात होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बालकांच्या आरोग्याच्या विचार करता भविष्यात लहान मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून बालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोंडपीपरीत स्वतंत्र कोविड कक्ष निर्माण करून बालरोग तज्ञांची नियुक्ती करावी अशी मागणी सुरज माडुरवार यंग ब्रिगेड गोंडपीपरी संस्थापक् अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तहसीलदाराना निवेदनातून केली आहे. यावेळेस यंग ब्रिगेड कार्याध्यक्ष ग्रा.सदस्य निकेश बोरकुटे, तालुका सचिव प्रमोद दुर्गे, उमेश उपासे, गुरुदास अलोने
यांची उपस्तिथी होती.