ताज्या घडामोडी

संविधानामुळे मिळालेल स्वातंत्र्य कसही उपभोगु नका – डॉ पवार

  • गुणवंत विद्यार्थी व नागरिकांचा सत्कार
  • संविधान दिनानिमित्त संविधानावर प्रबोधन

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता दिली. संविधानाने पुरुषाच्या बरोबरीने महिलांना समानतेचा अधिकार दिला. मागासलेली महिला ही शिकली, शिक्षीत झाली मात्र अजुनही त्या महिलेला स्वातंत्र्य, समता कळली नाही. मुल व मुलींत आजही समानता आहे. मात्र निसर्गाने असमानता निर्माण केली एकमेकांना समजुन घेन्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे बराच बहुजन समाज अंधारात खितपत पडला आहे. महिलांवर अत्याचार होतात कोनी समोर येत नाही. यासाठी महिलांनी एकनिष्ठ होवून संघटन व्दारे न्यायासाठी झटल पाहीजे. संविधान वाचुन आपन कीती ग्रहन करतो याला महत्व नाही ज्यांना संविधान कळल त्यांनी दुसऱ्याला वळवीले पाहीजे. महिलांना संविधानामुळेच स्वातंत्र्य मिळाल ते स्वातंत्र्य कसाही उपभोगु नका त्याचा योग्य उपयोग करा असल्याचे संविधान दीन संविधान प्रबोधन कार्यक्रमात महीलांना डॉ संध्या पवार यांनी स्त्रीयांच्या उत्थानात भारताचे संविधान विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले.


संविधान सन्मान दिन समारोह समिती वडाळा (पैकु) चिमूर च्या वतीने आदर्श विद्यालयाच्या पटांगणात संविधान सन्मान दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भैसारे, प्रमुख मार्गदर्शक नागपूर येथील साहीत्यीक लेखीका डॉ संध्या पवार, चामोर्शी येथील आंबेडकरी विचारवंत प्राचार्य श्याम रामटेके, चंद्रपूर येथील भारतीय संविधानाचे अभ्यासक अड भिमराव रामटेके, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख, समीक्षक लेखक वैरागडे आदी उपस्थीत होते.
या देशात अनेक संत, महापुरुष झाले त्यांनी पूर्व काळात आपल्या वानी व अंभग, श्लोकातुन संविधान दिले. त्यांचे विचार दाबन्याचा प्रयत्न केला गेला. नागरीकांना समजू दिले नाही अशी विषमता निर्माण केली असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भैसारे यांनी संविधानावर बोलताना विचार व्यक्त केले. पूर्वी संविधान कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता हल्ली संविधान दिवस म्हणून साजरा होत आहे. संविधानाची प्रास्तावीका उद्देशीका म्हणजे संपूर्ण संविधानाचे सार आहे. उद्देशीकातील प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आव्हाने खुब आहेत संविधानानुसार करता आले पाहीजे उद्देशीका संविधानाचा आरसा असल्याचे अड भिमराव रामटेके यांनी भारतातील संविधान आणी त्यापुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. भावी भारत कसा असायला पाहीजे हे संविधानात आहे. संविधान हा बेसीक लॉ आहे. या देशात समता निर्माण झाली पाहीजे. फुले शाहु आंबेडकरांनी संघर्ष केला म्हणून जगत आहोत येनाऱ्या पीढीला जगायचे असेल तर संघर्ष करने आवश्यक आहे.भारताच्या संविधान निर्मिती प्रक्रीयेत डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्राचार्य श्याम रामटेके बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान निट मध्ये प्रावीन्य मिळवीले मासळ येथील प्रलय कैलास गणविर, आकाश रत्नपाल गेडाम, आर्या आत्माराम ढोक, मोहक अशोक झाडे, क्षितीज रमेश मुन, राधीका सुभाष शेषकर, आयआयटी मध्ये प्रवेश मिळाल्या बदल स्वप्नील पुरुषोत्तम वाकडे, हर्षल सुधाकर पाटील, प्रित प्रकाश कोडापे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोद गेडाम, डॉक्टरेट (पीएचडी) पटवी बहाल झाल्याबदल प्रा. डॉ. हरेश गजभिये, डॉ सुरेश हुमने, प्रा.डॉ रागीनी भैसारे, प्रा. डॉ सुमेध वावरे, प्रा. डॉ. दिवाकर कुमरे आदीचा सत्कार करन्यात आला.
जेष्ट नागरीक रामकृष्ण ताकसांडे यांनी संविधान बाइक रॅली ला झेंडी दाखवली. रॅली च्या माध्यमातुन शहरातील थोर महापुरुष , संत, बौद्ध विहार व चिमूर क्रांती भूमीतील शहीद क्रांतीविरांच्या पुतळ्यांना पुष्प व हार अर्पण करन्यात आले. संविधान फलकाचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले.प्रास्तावीका चे वाचन पाकी पवण ताकसांडे हिने केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करन्यात आली. कार्यक्रमात पाहुन्याचे स्वागत कामीनी मेश्राम, वनमाला भैसारे, वर्षा गोंडाने यांनी गीताच्या माध्यमातुन केले. दरम्यान संविधानाची उद्देशीका फोटो फ्रेम राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांच्या हस्ते समारोह नियोजन समितीतील व्यक्तीनां देन्यात आली संविधान स्तंभ ची प्रतीकृती संविधान चौक येथे मार्गावर करन्यात आली. कार्यक्रमाचे संचालन किशोर नागदेवते, प्रास्तावीक महेंद्र लोखंडे, आभार गंगाधर भैसारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रकाश प्रबोधनी भिम गीता ने करन्यात आली. कार्यक्रमाला तालुक्यातील नागरीकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाला संविधान सन्मान दिन समारोह समिती च्या संयोजक, कार्यवाह यांनी विशेष सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close