महाराष्ट्रराज्य ग्राम पंचायत युनियन च्या वतीने गटविकास अधिकारी प.स. चिमुर यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत युनियन तालुका चिमुर र.न.४५११ च्या वतीने मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमुर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये युनियनच्या वतीने मा.गटविकास अधिकारी यांना सुचविन्यात आले की, संपुर्ण चिमुर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायत चे सचिव व सरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचे शासन अनुदान व्यतिरीक्त पगाराच्या ५० टक्के रक्कम व रहिवाशी भत्ता , भविष्य निधीची रक्कम मागील काही महिन्यापासुन प्रलंबित असुन दिवाळी सना पुर्वी सदर वेतन व इतर कामाच्या रक्मा देण्यात याव्या या विषयाची विनंती वजा इशारा दिलेला आहे. रक्मा न मिळाल्यास दिनांक १ / ११ / २०२१ पासुन पंचायत समिती प्रांगणात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे .
तसेच दिवाळी सना पुर्वी सदर मागण्या पुर्ण न झाल्यास मा.गटविकास अधिकारी व सर्व सचिव तथा सरपंच यांचे घरी दिवे लावून दिवाळी साजरी केली जाईल अशा प्रकारचे निवेदन सादर केले आहे .
सदर निवेदन देतांना ग्राम पंचायत कर्मचारी तालुका युनियन चिमूर चे अध्यक्ष श्री गोपाल गावतुरे व सचिव श्री किशोर कामडी उपस्थित होते .