ताज्या घडामोडी

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात सगळ्यात मोठी असलेल्या ग्रामपंचायत आल्लापल्ली शहराला 1करोड 40लाख रुपयाचे निधी मंजूर

स्थानिक आमदार निधी तसेच 25- 15 या विकास निधीतून आलापल्ली येथील सीसी रोड सीसी नाली बांधकामाला प्रारंभ…

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचा भूमिपूजन तसेच लोकार्पण…!!

नवनियुक्त युवा सरपंच शंकर मेश्राम यांचा पुढाकार…

एकूण तीन टप्प्यात उद्घाटन व लोकार्पण सोहळा चा आयोजन…!!

सन 2020-21 प्राप्त निधी…!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहर हे जिल्ह्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असून मागील अनेक वर्षापासून आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून आलापल्ली शहरातील जनतेने नेहमी ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काबीज करून ठेवले आहे. याच विश्वासाने आदरणीय धर्मराव बाबा आत्राम देखील आलापल्ली शहरातील जनतेवर प्रेम विश्वास ठेवून आलापल्ली शहरासाठी प्रत्येक वेळेस विकास काम आणून आज आलापल्ली शहराला एक विकासाची दिशा दिलेली आहे. त्याच अनुषंगाने माननीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या आमदारकी एक वर्ष कालावधी कोरोना या आजारा गेल्यानंतर सुद्धा आलापल्ली शहराच्या विकासात कोणत्या प्रकारचा अडथळा येऊ नये या अनुषंगाने आदरणीय धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या स्थानिक आमदार या निधीतून आलापल्ली शहराला सि सि रोड व नाली
बांधकाम साठी अंदाजे 40 लक्ष रुपये अदा केले तसेच आलापली शहरात अनेक वर्षापासून प्रत्येक वार्डात सी सी रोड नाली अशा अनेक अडचण जनतेला समोर जावे लागत आहे या गोष्टीचा आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या विकास निधीच्या 25-15 या विशेष योजनेतून आलापली शहराला 1 करोड रुपये निधी देऊन एकूण 30 कामे मंजुरी करण्यात आले .पहिल्या टप्प्यात एकूण 6 कामाचे उद्घाटन करून आज दुसऱ्या टप्प्यातील अंदाजे 17 कामा पैकी चार कामाच्या लोकार्पण तसेच 13 कामाच्या उद्घाटन झाले .आज तिसऱ्या टप्प्यात अंदाजे 10 कामापैकी 3 उद्घाटन तर 7 लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
कामाला प्रारंभ होऊन काही कामे झाले आहे व काही कामे प्रगतीपथावर आहे या सर्व कामे विकासपुरुष म्हणजे आदरणीय धर्मराव बाबा आत्राम त्यांच्या पाठोपाठ महिला नेतृत्व आदरणीय भाग्यश्री ताई आत्राम यांनी देखील आलापल्ली साठी जितका होईल तितका विकासकामांसाठी त्यांच्या हातभार नेहमीच असतो त्याच अनुषंगाने आदरणीय धर्मराव बाबा आत्राम तसेच भाग्यश्री ताई आत्राम यांनी आलापल्ली शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी नेहमी तत्पर असतात. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित आलापल्ली ग्रा.प चे युवा सरपंच शंकर मेश्राम ,उपसरपंच विनोद अक्कनपलीवार ,पेसाअध्यक्ष स्वामी वेलादी ,उपाध्यक्ष प्रीती ईस्टाम ,माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. प.सदस्य पुष्पाताई अलोने .माया कोरेत ,अनुसूर्या सपीडवार, सोमेश्वर रामटेके ,मनोज बोलुवार,संतोष अरका‌, स्वप्निल श्रीरामवार
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख श्री लक्ष्मण येरावार, वासुदेव पेदिवार , पराग पांढरे, किरण सल्लम, विशेष भटपलीवार व आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आलापल्ली शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close