ताज्या घडामोडी

अकोले तालुक्यातील अगस्ती हायस्कूलच्या सन 1987 सालच्या दहावीच्या बॅचच्या मित्रांचा “उंचखडक बुद्रुकमधील” कोरोनाबाधीत रुग्णांना “एक हात मदतीचा”

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

आज सोमवार दि.२४ मे २०२१ रोजी उंचखडक बुद्रुक येथील कोरोना पाॅझिटिव असलेल्या गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.खरे तर आज कोरोनाच्या महामारीत आणि लाॅकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील कोरोना झालेल्या लोकांच्या हाताला काम नाही,अशा परिस्थितीत गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये या सामाजिक भावनेतुन सन 1987 सालच्या अगस्ती हायस्कूलच्या दहावीच्या बॅचचे मित्र मैत्रीणी एकत्र आले आणि अकोले तालुक्यातील गावोगावी जाऊन कोरोना झालेल्या गरीब कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करत आहेत.प्रातिनिधिक स्वरूपात मित्रपरिवारेतर्फे मा.रामदास शेटेसाहेब,मा.मनोजराव गायकवाडसाहेब,मा.मधुशेठ बनकर,मा.संतोषजी नवले, मा.दत्तात्रय नवले,मा.सोमनाथ आवारी,मा.अरुण शेणकर यांच्या उपस्थित किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले.
सदर सामाजीक उपक्रमाचे अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तसेच श्री सद्गुरु यशवंतबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय श्री.अशोकराव देशमुखसाहेब यांनी या प्रकारच्या मदतीच्या माध्यमातुन खरोखर गरजुच रुग्णांना मदत होते अशी भावना व्यक्त केली तसेच ग्राऊंड लेवलंला काम करणाऱ्या या मित्रपरिवाराच्या कामाचे कौतुक करुन खरे “कोविडयोध्दे” हे असल्याची सद्भावना व्यक्त केली.प्रसंगी उपस्थित उंचखडक बुद्रुकच्या सरपंच मा.सौ.सुलोचनाताई शिंदे,उपसरपंच मा.महिपाल देशमुख(बबनभाऊ), मा.किशोरनाना मंडलिक,मा.मनोहर देशमुख,मा.बाळासाहेब खरात,मा.चंद्रभान देशमुख,मा.गुरुनाथ महाराज देशमुख,मा.सुनिलबापु देशमुख,मा.विलासकाका देशमुख,मा.राजेंद्र चाफेकर,मा.तुषारशेठ देशमुख तसेच उंचखडक बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उंचखडक बुद्रुकचे कार्यक्षम उपसरपंच माननीय श्री.महिपाल देशमुख(बबनभाऊ) यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close