खेळामुळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडते-सौ.भावनाताई नखाते
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी तालुका पाथरी येथे तालुका स्तरीय कुस्ती व बुद्धीबळ स्पर्धा संपन्न
दि. 22/11/22 रोजी शांताबाई नखाते विघालय, रामपुरी खु येथे शालेय तालुका स्तरीय कुस्ती व बुद्धीबळ स्पर्धा 14/17/19 या वयोगटातील मुले / मुली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री . मुकेश राठोड ( गटशिक्षण अधिकारी प .स . पाथरी ) कार्यक्रमाच्या उद्धघाटीका सौ भावनाताई नखाते ( मा . जि प . उपाध्यक्षा तथा सचिव वाल्मीकी शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी ) प्रमुख पाहुणे श्री गिल्डा सर, श्री चिंचाणे सर, श्री दत्ताराव कदम, श्री दत्ताराव चव्हाण, दिनकर नन्नवरे, खालेद चाउस आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सौ भावनाताई नखाते यांनी खेळाडुंनी दररोज खेळले पाहिजे खेळामुळे अष्टपैलु व्यक्तीमत्व तयार होते नेतृत्व गुण वाढीस लागतात माणुस निरोगी व दिर्घायुष्य . जगतो, जीव जगत असतांना सकारात्मकता वाढीस लागते त्याचबरोबर खेळामुळे खेळांडूना नौकरीस 5% आरक्षण मिळते भावी जीवनात करिअर घडविण्यास मदत होते एवढे बोलून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या . मा श्री . राठोड साहेबांनी अध्यक्षीय समारोप करतांना ऑन लाईन खेळाडू याद्याविषयी माहिती दिली व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या तसेच श्री गिल्डा सर (राष्ट्रपती पुरस्कार विजेते )यांनी खेळांचे महत्व सागितले व सांतत्याने मैदानावर सराव करावा असा सल्ला दिला .
सदरील स्पर्धेचे प्रास्ताविक क्रिडा संयोजक श्री शेळके सर यांनी केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सोळंके सर, श्री गजमल सर, श्री पोपळघट सर, श्री दताराव कदम, श्री . सोनवणे सर, श्री धनंजय नखाते, श्री दुधमोगरे सर, श्री जाधव सर श्री आष्टीकर सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.सुत्रसंचलन सोनवणे यांनी केले तर आभार ओम लांडे यांनी मानले.