भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सालेकसा च्या वतीने नमो चषक – २०२४ चे नोंदणी फार्म मोहिमेला सुरुवात
खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते झाले अभियानाला सुरुवात
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
सालेकसा:- तालुक्यातील साकरीटोला/सातगांव येथे आज दिनांक २९/१२/२०२३ रोज शुक्रवार ला भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सालेकसा तर्फे नमो चषक – २०२४ चा नोंदणी फार्म सदस्यता अभियानाची सुरूवात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनात खासदार अशोक नेते यांनी बोलतांना युवा मोर्चा च्या प्रत्येक कार्यकर्त्यांने सक्तीने भाजपा पक्षाच्या संघटनेच्या कामात सदैव पाठीशी उभे राहुन युवकांनी जास्तीत जास्त नमो चषक- २०२४ साठी सदस्यांनी नोंदणी करून यांच लाभ घ्यावे असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी भाजपा चे वरिष्ठ पदाधिकारी श्री सुनील अग्रवाल, आर,डी.रहांगडाले,प्रभारी अध्यक्ष भाजपा परशरामजी फुंडे,भाजपा महामंत्री श्री रामदासजी हत्तीमारे, श्री मनोजजी बोपचे,विक्कीजी भाटिया,घनश्याम कटरे,श्री भीमराज जी बोहरे,भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव हितेशजी डोंगरे, जिल्हा महामंत्री श्री आदित्यजी शर्मा,जिल्हा सचिव श्री टिकेशजी बोपचे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री देवराम चुटे, भाजपा युवा मोर्चा महामंत्री श्री अरविंदजी फुंडे,श्री गौरीशंकरजी टेंभरे,युवा मोर्चा चे पदाधिकारी श्री प्रतीक लिल्हारे,श्री दिनेश उईके,रविंद्र बिसेन,नितीन शिवणकर,पुथ्वीराज शिवणकर, अतुल निमनकर, विशाल चकोले,विजय रहिले, हितेश मेश्राम,धनजीत बैस,दिनेश बावनकर, महिला मोर्चाच्या संयोजिका किरणताई भगत, स्वेताताई अग्रवाल, टिनाताई चुटे,युवा मोर्चा चे अन्य पदाधिकारी व सदयगण उपस्तीत होते.