खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन सावली येथे अनेक युवकांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
सावली तालुक्यातील गोसीखुर्द रेस्ट हाऊस सावली येथे आज अनेक युवकवर्गानी भारतीय जनता पार्टी वर विश्वास ठेऊन खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात भगवा भाजपाचा दुपट्टा टाकुन अनेक युवकांनी भाजपात पक्षप्रवेश केला.
यात निखिल शेंडे, भास्कर शेंडे, लक्ष्मण प्रधाने,संदिप वाढई,भूषण प्रधाने, गणेश प्रधाने, अंकुश गुरूनुले,कुलभूषण मोहुरले, हरिदास वाढई,अमर शेंडे, अभिषेक प्रधाने इत्यादी व्यक्तीने भाजपात पक्ष प्रवेश केला.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना भारतीय जनता पार्टी हा जगामध्ये एक नंबर चा पक्ष असून भाजपा बलाढ्य पक्ष ठरला आहे. केंद्राबरोबरच देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे.याबरोबरच मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्यांचा युवकांचा ओढा अधिक वाढला आहे.यासाठी आपण केलेला पक्षप्रवेश निश्चित विश्वासार्हता आहे.असा विश्वास या पक्ष प्रवेश प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रामुख्याने ता.महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पा.गड्डमवार,भाजपा जेष्ठ नेते प्रकाश खंजाजी,सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे,नगरसेविका निलमताई सुरमवार,नगरसेविका शारदा गुरूनुले,सामाजिक नेते निखिल सुरमवार,युवा नेते राकेश विरमलवार, अल्पसंख्याक आघाडीचे रुकसार शेख, इमरान शेख,पुर्व विदर्भ सोशल मिडीयाचे संयोजक आनंद खंजाजी,सावली सोशल मिडिया प्रमुख मयुर गुरूनूले,तसेच युवक कार्यकर्ते उपस्थित होते.