कु. आसावरी संजय चांदेकर हिची जवाहर नवोदय विद्यालय निवड

जनता विद्यालय नेरी नवोदय विद्यालयात यशाची परंपरा कायम
या वर्षात विद्यालयातून नवोदय विद्यालयासाठी तिसरी निवड
प्रतिनिधी:राहुल गहुकर
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता विद्यालय नेरीची इयत्ता 5 विची विद्यार्थीनी कु. आसावरी संजय चांदेकर हिची जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे.
नेहमीप्रमाणे जनता विद्यालय नेरीने जवाहर नवोदय विद्यालयात यशाची परंपरा कायम ठेवली. दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी या परीक्षेत पात्र होत आहेत. त्याचप्रमाणे अनुराग संजय चांदेकर, वेदांत अजय सोमनाथे या दोन विद्यार्थ्यांसोबतच आता कु. आसावरी संजय चांदेकर हिची निवड नवोदय विद्यालय करीता झाली आहे. एकाच वर्षात एका शाळेतून तीन विद्यार्थी नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल सर्व पालक वर्गातून शाळेचे कौतुक होत आहे.
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी चे अध्यक्ष श्री. विष्णुकांतजी बिरेवार, उपाध्यक्ष श्री. टिकारामजी पिसे, सचिव श्री. सुनीलराव नागदेवते तसेच संपूर्ण संचालक, जनता विद्यालय नेरीचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. येरणे, नवोदय प्रमुख श्री. एस. पी. पंधरे , मार्गदर्शक शिक्षक श्री. बोदेले सर, कु. जीवतोडे मॅडम तसेच सर्व कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.
कु. आसावरीने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना दिले.