हज (उमरा)यात्रेकरू ताजुद्दीन शेख गावकऱ्यांकडून सत्कार
रेणाखळीकरांकडुन सर्व धर्म एकोप्याचे दर्शन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील रेणाखळी गावचे रहिवासी असलेले शेख ताजुद्दीन शेख हाशम हे सहकुटुंब हज यात्रेसाठी आज दि.२ फेब्रुवारी रोजी रवाना होत आहे त्या निमित्त गावातील सर्व धर्मीय गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शेख ताजुभाई हे रेणाखळी परिसरात सर्वपरिचित असुन सर्व धर्मातील लोकांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहे त्यामुळे त्यांच्या सत्कार शुभेच्छा सोहळ्याला बहुसंख्य लोक उपस्थित होते. रेणाखळी गावात सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून हिंदुंचे ग्रामदैवत हनुमान मंदिर हे मुस्लिम वस्तीत असून मुस्लिम समाजाची मुख्य मस्जिद ही हिंदू वस्तीत आहे त्यामुळे नेहमीच एकोप्याने दर्शन पहायला मिळते या वेळी सरपंच राहुल ब्रम्हराक्षे, सोसायटी चेअरमन दादाराव हारकळ, शिवसेना नेते तुकाराम हारकळ,मुंजाभाऊ हारकळ, दादाराव अन्ना हारकळ, ग्रामपंचायत उपसरपंच अनिस भाई, ग्रामपंचायत सदस्य शेख अलिमभाई, शेख चांद पाशा ,अफसर जमिनदार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उध्दव इंगळे ,शेखआरेफ व गावातील सर्व मित्रमंडळी उपस्थित होते सर्वांनी शेख ताजुभाई व कुटुंबीयांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.