आंबोली मध्ये उमेदचे वार्षिक अधिवेशन
प्रतिनिधी :हेमंत बोरकर
मो.9403884389
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर व संस्कृती महिला प्रभाग संघ, भिसी-आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन घेण्यात आले.
महाजीविका अधिवेशन कार्यक्रमाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ सतीशभाऊ वारजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती रोशनभाऊ ढोक, प्रभाग संघ अध्यक्ष सुनिता पाटिल, सचिव वैशाली भशारकर, आंबोलीचे सरपंच शालीनीताई दोहतरे, उपसरपंच वैभव ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य शुभम मंडपे, बँक मॅनेजर अमित वाघाडे, तालुका अभियान व्यवस्थापक राजेश बारसागडे, पूर्ण तालुका उमेद टीम, प्रभाग संघ पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी व सर्व कॅडर उपस्थित होते.