ताज्या घडामोडी

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत पोट निवडणुकीत आविसच्या बाजी

राजाराम मध्ये बसणार आविस ची सत्ता..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यातील १४ ग्राम पंचायत मध्ये पोट निवडनूक पार पाडली आहे.यामध्ये महत्वाचे ग्राम पंचायत राजाराम होता,कारण कि राजाराम ग्राम मध्ये सार्वत्रिक निवडणुका २०१८ ला झाले असुन सरपंच पदांसाठी थेट जनतेतून सरपंच निवड करण्याच्या होता,राजाराम ग्राम पंचायत मध्ये ९ सदस्य व थेट सरपंच असे निवडणुका झाले होते त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या समर्पित थेट सरपंच व आठ सदस्य निवडुन आले होते.
मात्र स्थानिक राजकारणात विरोध झाल्याने अडीच वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने सरपंच व सहा सदस्याच्या पद रिक्त झाला.
त्यामुळे सहा सदस्यसाठी पोट निवडणुक घेण्यात आले.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,यांच्या मार्गदर्शनात अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री. भास्कर तलांडे,जि.प सदस्य श्री. अजय नैताम,नेत्रुत्वात निवडणुका पार पाडले असुन श्री.नागेश कन्नाके,सौ.सपना तलांडे,कु.प्रिया पोरतेट,असे तीन सदस्य निवडून आले असुन उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर व सदस्य श्री.नारायण काम्बगौनिवार असे पाच सदस्याच्या बहुमत असल्याने राजाराम ग्राम पंचायत वर आविसच्या झेंडा फड़कणार हे मात्र निश्चितच आहे.
२३-१२-२०२१ ला मतमोजणी झाली,यात ग्राम पंचायत पेठा १ मरपली १,रेपनपली १,किष्टापूर वेल १,येडमपली १,वट्रा १,देवलमरी १कमलापूर १ असे पद्धतीने आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारत पुन्हा एकदा आपले वरचढ कायम ठेवले आहे.
मतमोजणी झाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितित अहेरी तहसिल कार्यालया ते अहेरीतील मुख्य चौकापर्यंत विजयी रैली काढत फटक्यांच्या अतिषबाजी करण्यात आली.यावेळी जि.प.सदस्या कु.सुनिता कुसनाके,,प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी प.स.सभापती तथा विद्यमान प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,
राजारामचे उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकदर,इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाब सोयाम,ताणबोडीचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,पेरमिलीचे सरपंच श्री.प्रमोद आत्राम,देवलमरीचे माजी उपसरपंच जगनाथ मडावी,श्रीनिवास राऊत,राजारामचे माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,मूत्ता पोरतेट,सुरेश सोयाम,राकेश सड़मेक,वसंत सड़मेक,प्रभाकर पोरतेट,विलास दुर्गे,राजेश दुर्गे,नितेश चंदनखेडे,आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,आविसचे ग्रामीण अध्यक्ष मो. इरशाद शेख,मो.अरफाज शेख,शिवराम पूल्लूरी,नरेंद्र गरग़म,पुनेश कंदीकुरवार,प्रकाश दुर्गे,लक्ष्मण आत्राम,आदिंनी मेहनत करून सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close