श्री साई पंढरपूर दिंडीची सांगता
श्री साई पंढरपूर दिंडीची सांगता

श्री साई पंढरपूर पायी दिंडी नंतर परमपूज्य साईबाबांच्या दिव्य चैतन्य पादुकांचे साईबाबा जन्मस्थान मंदिरात
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ॲड. मुकुंदराव दिनकरराव चौधरी मालक दिंडी व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी व त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ अश्विनी चौधरी, संतोष राव चौधरी. सौ अर्चना चौधरी, तेजस चौधरी, ॲड. अतुल दिनकरराव चौधरी सचिव तथा व्यवस्थापकीय विश्वस्त यांचे सह पुनरागमन झाले.
ॲड. मुकुंदराव दिनकरराव चौधरी, दिंडी व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी यांनी मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने परमपूज्य साईबाबांच्या पादुका आणल्याने त्यांना साईबाबा स्वरूप मानून त्यांचे पाद्य प्रक्षालन करण्यात आले. दिव्य चैतन्य साईबाबांच्या पादुकांचे सौ अर्चना संतोषराव चौधरी, सौ. छाया कुलकर्णी मंदिर अधीक्षिका, सौ सुनंदा लक्ष्मीकांत जोशी श्रीमती वर्षा लक्ष्मीकांत कुलकर्णी, शिवकन्या नागठाणे, सौ कलाबाई कांबळे, श्रीमती कमलबाई तेलंगे वगैरे सुवासिनींनीऔक्षण करून करून साईबाबांच्या दिव्य चैतन्य पादुकांचे अत्यानंदाने भक्ती भावाने सहर्ष स्वागत केले .
या भक्ती भावपूर्ण सोहळ्यात योगेश इनामदार गुरुजी,बालाजी बेद्रे, विष्णूजी शिंदे, सुधाकर बेदरेएन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, ओंकार मुंजाजी हिवाळे(बाबा) वगैरे उपस्थित होते.









