ताज्या घडामोडी

बेंबळा येथे वृक्षारोपण करूण पर्यावरण संवर्धन समीती ची स्थापणा

पर्यावरण संवर्धन समीती चा स्तुत्य उपक्रम

तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा

शेगाव—- वरोरा तालुक्यातील सर्वात शेवटचा टोकावर असलेल्या बेंबळा येथे पर्यावरण संवर्धन समीती ची स्थापणा करण्यात आली.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व वन आच्छादन वाढविण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे संतूलण कायम ठेवण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे परंतु २०टक्केच वनक्षेत्र असल्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे गरजेचे आहे हाच उद्देश ठेवून वरोरा तालुक्यातील बेंबळा येथे वृक्षारोपण करूण पर्यावरण संवर्धन समीती ची स्थापणा करण्यात आली
यावेळी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे, वरोरा विभाग प्रमुख कांचण पेटकर ,बेंबळाचे उपसरपंच तुमदेव राऊत ,वनसमीती अध्यक्ष विनोद हणवते , बेंबळाचे ग्रामपंचायत सदस्य अमोल वाघाडे, बेंबळाचे पोलीस पाटील मणिषा सोनवाने ,राहुल वाघाडे ,वसंता मेश्राम ,दिपक भोयर ,मनोज भोयर ,गणेश जांभळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

“”पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे यांचे नेतृत्त्वात वरोरा तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करणार””

कांचण पेटकर
वरोरा विभाग प्रमुख पर्यावरण संवर्धन समीती बेंबळा

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close