ताज्या घडामोडी
नालंदा अभ्यासिका केंद्र पळसगांव च्या वतीने शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आज पळसगांव येथे नालंदा बुद्ध विहाराच्या आवारात नालंदा अभ्यासिक केंद्राच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चे नियम पाळून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिवरायांचे कार्य आणि पराक्रमांच्या स्मृतींना मान्यवर वेक्तीने उजाळा दिला आहे.या वेळी सरपंच सरिता गुरनुले,कृष्णा पाटील सिदांत रामटेके,संदीप ढोक,अंकित गजभिये,शैलेश खोब्रागडे, तृप्ती रामटेके,संचालन अनामिक पाटील,प्रतीक पाटील अक्षय रामटेके,संघमित्रा खोब्रागडे, पर्वताबाई खोब्रागडे ,हिराबाई खोब्रागडे,आभार प्रदर्शन संदीप ढोक यांनी केले या वेळी मान्यवर मंडळी उपस्थिती मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली