ताज्या घडामोडी

भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या प्रयत्नाला यश ; लोहारा येथे दिव्यांग राखीव निधी वाटप

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

चिमुर तालुक्यातील लोहारा येथे दिव्यांगाच्या कल्याणार्थ ग्राम पंचायतीने 5 टक्के राखीव निधी तात्काळ खर्च करण्यात यावा यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने सतत मागणी रेटून धरली.
शासननिर्णयानुसार दिव्यांगाच्या कल्याणार्थ 5 टक्के राखीव निधी खर्च करण्याबाबतची तरतूद आहे. भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या प्रयत्नातून अखेर लोहारा ग्राम पंचायतीने दिव्यांगाचा 5 टक्के राखीव निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला. लोहारा येथील दिव्यांगाना चेक स्वरूपात निधी खर्च केला.
यावेळी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे नानाजी ठोमळे, स्वपील चौधरी स्वाती श्रीरामे , सुर्यभान चोधरी यानीं आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close