ताज्या घडामोडी

शहर कांग्रेस कमिटी चिमूर यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

जि. प.गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

देशभरात कोरोना सारखा महाभयंकर व्हायरस आला आपण त्यावर कशीतरी मात केली परंतु आता मात्र दुसरा ओमायक्रॉन हा एक नवीन व्हायरस देशात आला आहे कोरोना व्हायरस आल्या नंतर बहुतांश नागरिक मृत्यू मुखी पडले,कुणाला दवाखान्यात जागा नाही,तर कुणाला रक्ताची गरज ,तर कुणी उपचार करण्यासाठी नेताना मृत पावले ,परंतु आता मात्र तशी परिस्थिती कुणावर येणार नाही व कुमाला रक्ताची कमी पडणार नाही हा दृष्टिकोन समोर ठेवून चिमूर शहर कांग्रेस कमिटी यांनी आज दि.२५.१२२०२१ ला इंदिरा गांधी चौक चिमूर येथे रेनबो ब्लड अँड कंम्पोनंट बँक रामदास पेठ नागपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उदघाटन ७४.चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते पार पडले, तसेच रक्तदान करणाऱ्याना शहर कांग्रेसचे तर्फे बेग देण्यात आली या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजयजी घुटके,कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी तालुका अध्यक्ष माधवजी बिरजे,कांग्रेस जेष्ठ नेते धनराजजी मालके,शहर अध्यक्ष अविनाशभाऊ अगडे, उपाध्यक्ष गुरुदास जुणघरे, मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख, तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , माजी नगर सेवक नितीन कटारे , दीपक कुंभारे नागेंद्र चट्टे, सारंग बारापत्रे , रविंद्र अगडे दीपक अनिल राऊत शेडामे , उपाध्यक्ष राजूभाऊ चौधरी, माजी बांधकाम सभापती कदिरभाई शेख चाचा , ता.उपाध्यक्ष विनोद ढाकुनकर,डॉ.शिवरकर साहेब पोलीस निरीक्षक मनोज गभने साहेब,विनोद अड्याल साहेब, पप्पूभाई शेख,मंगेश घ्यार, तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा सविताताई चौधरी, वनिताताई मंगरे,गीताताई रानडे,ममताताई भीमटे, दीक्षाताई भगत,शहणाज अंसारी इत्यादी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close