निर्मलचे निवडणूक प्रभारी तथा खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
तेलगांना राज्यातील जिल्हा निर्मल येथील निर्मल क्षेत्राचे उमेदवार मान.माहेश्वर रेड्डी यांच्या निवासस्थानी भाजपा संघटनेची महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकिचे आयोजन निर्मल जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख महाराष्ट्र राज्याचे खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली व निवडणूक प्रभारी आमदार नामदेवजी ससांणे व आमदार केशव प्रसाद जी च्या उपस्थितीत संपन्न
निर्मल भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोकजी नेते यांना तेलंगणा राज्यांत निर्मल जिल्ह्यातील निर्मल, खानापुर, मुधोल या क्षेत्राची महत्वपुर्ण जबाबदारी दिल्याने या क्षेत्रात भारतीय जनता पार्टी चा कसा विजय होईल.या तिन्ही विधानसभा कशा जिंकता येईल,यासाठी भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुखांना दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी.याकरीता भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे.असे आवाहन करतनिवडणूक नियोजन, व्यवस्थापन, संबंधित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येनी युवक वर्गानी व महिला भगिनींनी भाजपा चा दुपटा टाकुन भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी प्रामुख्याने जिल्हा निर्मलचे प्रभारी जिल्हा महामंत्री मेडीसेमे राजू,विस्तारक विलास गादे,आयना गहारी बोमया आदिलाबाद विधानसभा प्रमुख,भुपती रेड्डी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रजनी वैद्य,अलवेली मंगा तसेच भाजपा पदाधिकारी, आघाडीयांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.