ताज्या घडामोडी
वंचितच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहदीप खोब्रागडे यांची नियुक्ती

ग्रामीण प्रतिनिधीःराहुल गहुकर नेरी
वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्नेहदीप खोब्रागडे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.

ते उच्चशिक्षित असून मागील अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यप्रणालीने वेगळा ठसा उमटविला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष आणि आता जिल्हा उपाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.
त्यांचे मुळ गाव चिमूर तालुक्यातील मौजा नेरी आहे.
त्याच बरोबर मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.
या निवडीचे स्वागत ॲड. ज्ञानेश्र्वर नागदेवते सर,विलास रणदिवे सर,विलासजी मेहरकुरे,अशोकजी तिडके, प्रविण मेश्राम,सुनील दडमल,संदीप हिंगे,विकेश जनबंधू,रामदासजी बावणे,कवडू दडमल,बाळकृष्ण ढोले, नजीर शेख अंकित पोईनकर आदि नी केले आहे.