खेरडा महादेव येथे अन्नत्याग उपोषण

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ खेरडा महादेव येथे सुप्रसिद्ध भारूडकार श्री ह भ प त्रिंबक महाराज आम्ले यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण केले असून, दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय तहसीलदार साहेब पाथरी यांना समस्त गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर येथून भव्य वारकरी दिंडी मिरवणूक काढण्यात आली, मिरवणुकीत सर्वश्री मधुकर आम्ले, किशन शिंदे, लक्ष्मण सिताफळे, शरद आमले, बाबासाहेब आम्ले, गणेश सीताफळे, ज्ञानेश्वर आमले व सर्व वारकरी मंडळीचा समावेश होता ही मिरवणूक महादेव मंदिर खेरडा येथे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन उपोषण स्थळी पोहोचल्यानंतर त्र्यंबक महाराजांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन उपोषणास प्रारंभ केला.

या संघर्षासाठी मुख्यत्वे करून श्री विनायक आम्ले, गणेशराव लांडगे, भास्करराव आम्ले, शेख अफसर, धनंजय आमले यांनी मोलाचे सहकार्य केले प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री विजयकुमार सीताफळे पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच सरपंच रामचंद्र आमले, अशोक आमले यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक अभिजीतराव आम्ले, आबासाहेब आमले, ज्ञानेश्वर आमले, गंगाधरराव आम्ले, शेखलाल शेख, जमीर खान पठाण, प्रा. वसंतराव आम्ले, बापूराव वऱ्हाडे, किसनराव मस्के, बालासाहेब आम्ले, भगवानराव आम्ले, मधुकर सिताफळे आणि सर्व गावकरी मंडळींची उपस्थिती होती. सदर आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्र्यंबक महाराजांचे चिरंजीव प्रताप आमले यांनी सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.