परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकल मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मराठा आरक्षण योद्धा श्री जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून, आज परभणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात बेमुदत साखळी उपोषणाला मराठा समाजाच्या मोठ्या संख्येने पहिल्या दिवसाची सुरुवात झाली..!!
यामध्ये परभणी शहरातील मराठा बहुसंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. यावेळी अनेक मराठा बांधवांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली तसेच मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा भावना व्यक्त केल्या ..!!!
उद्यापासून शेंद्रा गावातील गावकरी मराठा बांधव बेमुदत साखळी उपोषण करत आहेत
तरि जास्तीत जास्त शहरातील बांधवांनी यामध्ये आपला वेळ काढून सहभाग नोंदवावा असे आवाहन सकळ मराठा समाजाच्या वतीने आज करण्यात आले आहे..!!!!