ताज्या घडामोडी

चिमूर येथे ग्रामजयंती प्रबोधन यात्रेचे समारोप

प्रबोधन यात्राने 22 दिवसात 188 गावाला ग्रामजयंतीचा दिला मंत्र

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत चिमूर तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळ कार्यकारिणी, प्रचार समिती द्वारा ग्रामजयंती प्रबोधन प्रचार यात्रा ला गोंदेडा गुंफा येथून सुरवात झाली असून 22 दिवसात 188 गावांना भेटी देऊन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार करून गावागावात ग्रामजयंती साजरी करून दि 25 एप्रिलला या प्रबोधन प्रचार यात्रेचा समारोप चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयात होणार आहे .

सदर प्रबोधन यात्रा दि.3 एप्रिल ते 25एप्रिल 2026 आयोजित केली होती या प्रबोधन यात्रेत चिमूर तालुका,पवनी तालुका, नागभीड तालुका, सिंदेवाही तालुका, वरोरा तालुका,समद्रपूर तालुका, भिवापूर तालुका मधील एकुण 188 गावात जाऊन ग्रामजयंती विषयावर प्रबोधन करण्यात आले समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विठ्ठल सावरकर सर विदर्भ प्रांत सेवाधिकारी, उदघाटक म्हणून आमदार बंटी भांगडिया,चिमूर, प्रमुख उपस्थिती म्हणून,डॉ दीपक यावले, डॉ प्रफुल बन्सोड, प्रा अशोक चरडे गुरुजी ,राजू देवतळे,प्रा महादेव पिसे, प्रा रूपराव कावळे, तहसीलदार श्रीधर राजमाने, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे ,प्रा राम राऊत,डॉ शाम हटवादे, नथ्यू भोयर, घनश्याम चाफले,विजय घरत आदी सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेव्हा होणाऱ्या कार्यक्रमाला गुरुदेव भक्त भाविक आणि जनतेनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close