ताज्या घडामोडी

गरिब,गरजु,अंपग,निराधार विधवा महिलांना पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे शिलाई मशिनचे वाटप व समाज सेवकांचा सन्मान

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती आगळा-वेगळा उपक्रम

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.१२/५/२०२२ : धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडगाव येथे पोलीस मिञ परिवार समन्वय समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सयुंक्त विद्यामानाने “महात्मा ज्योतिबा फुले,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” जयंती निमित्त नेहमी पोलीस विभागासाठी व सर्व सामान्यांच्या न्याय व हक्कासाठी व अती दुर्बल घटकांनसाठी पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे सर्व पदधिकारी कार्यरत आहेत.त्याचेच औचित्य साधुन गरजु,अंपग,गरिब निराधार विधवा महिलांना शिलाई मशिनचे वाटप व समाजातील दुर्बल घटकांनसाठी,व त्यांच्या न्याय हक्कासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे,मा.सुभाषजी सोंळके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,मा.मनिष गुडधे अमरावती विभागिय प्रमुख,मा.धनश्यामजी भिमटे सामाजिक कार्यकर्ता,मा.गजाननजी कडु सरपंच झाडगाव,मा.देवचंदजी राठोड सामाजिक कार्यकर्ता, मा.अडाळकर सर,मुख्याध्यापक जि.प.हायस्कुल,अशोकभाऊ अलोणे सामाजिक कार्यकर्ता,मा.महल्ले सर गुरुदेव सेवामंडळ,मा.रंजुताई अलोणे,नामदेवरावजी बमनोटे समाजिक कार्यकर्ता,मा.प्रकाश काळपांडे सामाजिक कार्यकर्ता,मा.अभिषक कडु समाजिक कार्यकर्ता,राहुल ठाकरे व या उपक्रमाची सर्वश्री जबाबदारी साभांळणारे मा.बाबारावजी इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सर्व प्रथम सर्व पाहुण्यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याचे व प्रतिमेचे पुजन केले.वैशालीताई श्रृंगारे,दुर्गाताई पोहेकर,सिमाताई बनसोड,प्रियंकाताई जाधव,साधना ताई बनसोड या निराधार महिलांना कुंटुबियांच्या उदर निर्वाहसाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.सुभाषजी सोंळके,श्री.अडाळकर सर, धनश्यामजी भिमटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.घरचा कर्ता व्यक्ती आपल्यामधुन निघुन गेल्यावर कुंटुबियांची परस्थिति अस्त-व्यस्त होते. करिता आपण आपली मानसिकता बदलुन अश्या
निर्बल,गरजु विधवा,अपंग महिलांना व त्यांच्या कुंटुबियांना आमची समिती सतत मदत व सहकार्य करीत असते.आपणही हि जबाबदारी स्विकारावी अशे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संघपालजी उमरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन मा.प्रशांत नाईक यांनी तर आभार धम्मा खडसे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे पदधिकारी बाबारावजी इंगोले,प्रशांत नाईक,हेमंत सोनुरकर,धम्मा खडसे,मनोज शिंगणापुर,विजय कांबळे,गजानन कांबळे बंटि शिगंणापुरे,अक्षय अलोणे,प्रतिक खांडेकर,निलेश गाडेकर,उमेश बनकर,विनोद शिंगणापुरे,प्रमोद शिंगणापुरे, नामदेवरावजी कांबळे,जळीतकर,विठ्ठल तुरसकर,राजु सत्वे तंटामुक्ती अध्यक्ष झाडगाव,भिमराव ठाकरे,राऊत,भिमटे,संजय राउत व ईतर सर्व कार्यकर्तांनी सहकार्य व मदत केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close