ताज्या घडामोडी
मुस्तफा अन्सारी यांची ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
मुस्तफा गुलाम यांची (०६/ऑक्टोबर) रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली. मुस्तफा अन्सारी यांना हे निवडपत्र देण्यात आले आहे. मुस्तफा अन्सारी यांची अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राज बेलदार यांनी निवड केली. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाजातील सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत होत आहे. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाने आशावाद व्यक्त केला आहे. मुस्तफा अन्सारी हे पक्षाची विचारधारा मजबूत करण्यासाठी निश्चितच यशस्वी प्रयत्न करतील, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.