चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करा:-शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे
अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर तालुक्यात नऊ ते दहा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने चिमूर तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरुन वाहू लागले आहे.होणाय्या सतत धार धार पावसामुळे जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिता ग्रस्त झाला आहे .त्या करिता चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे……. सविस्तर असे की चिमूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.शिवाय त्यात अतिवृष्टी हे चित्र मात्र शेतकऱ्यांना पहावसे वाटत नाही.काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे चिमूर तालुक्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे चिमूर तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहात असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात सोयाबीन तुर कापूस या सारख्या पिकांची माती सह रोपटे वाहुन गेले आहे.त्यामुळे चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुसकान भरपाई देण्यात यांवी अशी मागणी समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे.