ताज्या घडामोडी

जिल्हा निर्मिती साठी नागभीडकर मैदानात

  • निकषानुसार जिल्हा निर्मिती साठी उच्च न्यायालयात दाखल करणार जनहीत याचिका..

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड: नागभीड जिल्ह्याच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा नागभीडकर मैदानात उतरले आहेत.. जनता कन्या विद्यालयाचे माजी प्राचार्य हरिचंद्र मेहर यांच्या अध्यक्षतेखाली तथा झेप निसर्ग मित्र संस्था नागभीड द्वारा आयोजित काल झालेल्या नागभीड जिल्हा संघर्ष समितीच्या बैठकी मध्ये नागभीड हे ठिकान भौगोलिक,समाजिक,सांस्कृतिक दृष्टया सर्व सोयी युक्त मध्यवर्ती ठिकाण असून नागपूर,वर्धा,यवतमाळ,अमरावती,भांडारा, गोंदिया,गडचिरोली या प्रमुख जिल्ह्यानां जोडणारा महत्वाचा दुवा असून निकषानुसार जिल्हा निर्मिती होण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या ठराव एकमताने पारीत करण्यात आला.. या बैठकीत जिल्हा मागणी संदर्भातील नागभीड व्यापारी संघाचा ठराव तसेच नागभीड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायंती चे ठराव, ग्रामसंघाचे ठराव, विविध समाजिक संघटना,संस्था,पतसंस्था, बचत गट, यांचे ठराव घेण्याचे ठरले… यासोबतच बर्षभर विविध उपक्रम घेण्याचे ठरले. या बरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन जिल्हा जिल्हा मागणी चे मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार करणे,निवेदने देणे असे निर्णय घेण्यात आले…या सभेला अध्यक्ष स्थानी मेहर सर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प.सदस्य संजय गजपुरे,ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकृष्ण देव्हारी,भाऊराव डांगे, मनोज रडके, विजय बंडावार , अशोक वारजुकर , रमेश ठाकरे, प्रा. संदिप सातव , पत्रकार अरुण गायकवाड , पवन नागरे, अमित देशमुख , विक्की मडकाम , सचिन कठाणे , पंकज गरफडे या सह विविध समाजिक संघटनाचे पदाधिकारी, नागभीड व्यापारी संघ, विविध राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते,सेवाभावी संघटनानाचे पदाधिकारी उपस्थित होते…

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close