शाळा सेवक माधवभाऊ मिसार यांचा निरोप समारंभ
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आनंद अंध विद्यालय, आनंदवन येथील जेष्ठ शाळा सेवक माधव बालाजी मिसार यांना त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त एका छोटेखानी समारंभात नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला. माधव बालाजी मिसार हे शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ तथा सत्कार सोहळा आनंद अंध विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती संस्थेचे विश्वस्त तथा आनंदवनचे माजी सरपंच सुधाकरजी कडू गुरूजी होते. तर प्रमुख पाहुणे संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा अधिक्षक रविंद्र नलगिंटवार, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवक बांगडकर सर सत्कारमुर्ती माधवभाऊ मिसार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात आनंद अंध विद्यालयाच्या अंध मुलांनी स्वागत गिताने केली. यावेळी तबला व पेटीची साथ कोबडे- तेलंग यांनी दिली.
यावेळी माधव मिसार यांचा शाल व श्रीफळ, पुष्प -गुच्छ व भेटवस्तू देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांगडकर यांनी केले. संचालन वर्षा उईके यांनी केले तर आभार परमानंद तिराणिक कलाशिक्षक यांनी मानले. शाळेतील शिक्षक- शिक्षिका तनुजा सव्वाशेरे, साधना माटे, विलस कावनपुरे, कृष्णा डोंगरवार, मेकले, जितेंद्र चूदरी, छाया कशीद, सतवन सरीयाम शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.