भारताचे मोठे योगदान असताना राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारत स्थायी सभासद का नाही? : मा. प्रा. निखिल बोरकर
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील ‘राज्यशास्त्र विभागातर्फे’ “संयुक्त राष्ट्रसंघटनेत भारताची भूमिका” याविषयावर प्रा.निखिल बोरकर यांचे ” व्याख्यान” आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा. डॉ. तक्षशिल सुटे., तसेच कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा. निखिल बोरकर. राज्यशास्त्र विभाग एस. एफ महाविद्यालय नागपूर., कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. दिनेश लोखंडे. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तावना डॉ. तक्षशिल सुटे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा परिचय, ओळख व राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. निखिल बोरकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत भारताची मुख्य भूमिका असतांनाही संयुक्त सुरक्षा परिषदेचे भारताला स्थायी सदस्यत्व का नाही ? असा प्रश्न आपल्या वक्तव्यातून त्यांनी उपस्थित केला.जागतिक पातळीवर असलेले आंतरराष्ट्रीय कायदा व आंतरराष्ट्रीय संबंध यांचे जागतिक पातळीवर महत्त्व आणि स्पर्धा परीक्षेच अभ्यासक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रा. दिनेश लोखंडे. यांनी अध्यक्षीय भाषणात कला शाखेच महत्त्व हे स्पर्धा परीक्षेत अतिशय मोलाचे आहेत. म्हणून सर्व कला शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उतरा, व त्यामध्ये आपला सहभाग अवश्य दर्शवा असे मोलाचं प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रा. राजेश गजभिये यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन .कु पानाला यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या स्वरूपात सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली. व कार्यक्रम यशस्वीसाठी पार पडला.