पात्रुड ग्रामपंचायत मध्ये शांतता बैठक संपन्न
शहर प्रतिनिधी :अलीम इनामदार पात्रुड
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे वाढत्या कोरोनाच्या अति प्रादूर्भावामुळे,(रमज़ान ईद) निमित्त पात्रुड ग्रामपंचायत मध्ये शांतता बैठक घेण्यात आली.या वेळी सर्व ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासना मार्फत संबोधन करण्यात आले,की येत्या पवित्र रमज़ान ईद मध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना काळ लक्षात घेऊन,
आणि सर्व नियमावली लक्षात घेऊन,ईद -उल- फित्र ( रमज़ान ईद) ची नमाज़
ईदगाह आणि मस्जिद मध्ये अदा न करता,
आप-आपल्या घरातच अदा करावी.कोणत्याही अत्यावश्यक कामा-शिवाय घराबाहेर पडू नये म्हणून माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशन चे ,पी. आय. संतोष पाटील,स.पो.नि.ईधाटे,
आणि ए.एस.आय.आईटवार,
यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.यामध्ये माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉ.वसीम मनसबदार यांनी बैठकीत सांगितले की,कोणी कोणत्याही अत्यावश्यक कामा-शिवाय घराबाहेर पडू नका, किंवा कोरोनाला अंगावर खेचून आणल्या सारखं करू नका.
सोबतच पात्रुड ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच यांनीही मनोगत व्यक्त केले.