ताज्या घडामोडी

चिमूर पंचायत समिती मध्ये कृषी अधिकारी यांचा हलगर्जीपणा

चिमूर तालुक्यातील अनेक विहीर लाभार्थ्यांचे कामे रखडळी

कोरोनाच्या आपत्कालीन काळात कृषी अधिकारी यांच्या मनमानी कारभारा मूळे शेतकरी वर्ग त्रस्त

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चिमूर तालुका सर्वात मोठा असल्याने या परिसरात सर्वात गोरगरीब शेतकरी कार्यरत आहे या पाच वर्षा मध्ये केंद सरकार नी सिंचनाच्या अनेक योजना राबवून व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भागडीया यानी अनेक योजनांचे शासनाला पाठपुरावा करून आपल्या तालुक्यातील विकास कामा वर भर दिले पंचायत समिती मध्ये अशी अनेक कर्तव्य दक्ष कृषी अधिकारी आले आणि गेले या सर्वांनी कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कधी त्रास दिला नाही व वेळेवर कार्यालयात हजर राहून येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून
त्यांना दिलासा दिला परंतु धनशाम पसारे या कृषी अधिकाऱ्यांची बंदली ब्रह्मपुरी ला झाली व चिमूर तालुक्याला कामाचे ग्रहण लागले कृषी अधिकारी यांचा पदभार शिवाजी टाकरस यांचे कडे आला परंतु कृषी अधिकारी यांची जागा भरली असल्याने त्याचे जागी बी. पी. राठोड हे आले पी. जी. राठोड हे चंद्रपूर ला मुक्कामी राहत असल्याने गेल्या अनेक वर्षात जे पण कृषी अधिकारी या तालुक्याला लाभले हे सर्व जवळपास व मुक्कामी चिमूर शहरात राहत असल्याने कार्यालयात त्यांना भरपुर वेळ देता येऊन अनेक गोरगरिब शेकऱ्याची कामे झटपट होऊन या मिळणाऱ्या सोयी सुविधा चा लाभ लवकरात लवकर मिळायचा परंतु आता हे चित्र वेगळे आहे राठोड साहेब दुपार खाटल्या चिमूर पंचायत समिती मध्ये येतात व लवकरच आपल्या गावाकडे निघून जातात कारण काय तर कोरोना आहे काही होणार नाही मी विचारतो मी येतो तुमची विहीर कोणत्या वर्षी मंजूर झाली किती पैसे मिळाले तुमची विहीर कोण्या साहेबाच्या काळात मजूर झाली आपलं नाव गाव सांगा मी लवकर आपल्या गावात येऊन आपल्या विहिरीचे काम बघतो परंतु शेतकरी ठरलेल्या दिवशी साहेबाला भेटायला आला तर साहेब गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी चिमूर शेतकऱ्यांच्या तोंडातून एकाला मिळत आहे पी. जी. राठोड कृषी अधिकारी आपल्या पदाचा कारभार घेतल्या अंदाजे दोन महिन्यांच्या वर कालावधी लोटून सुध्दा चिमूर तालुक्यातील कामाची गती शून्य एकीकडे या कोरोना महामारीत अनेक शेतकऱ्यांनी गहाण सहान करून सावकारी कर्ज काढून मंजूर झालेल्या विहिरीचे कामे पूर्ण केली तरी त्याना एकही देयके मिळाली नाही या विहिरी च्या व सिचाई साधने सुविधा पासून आपल्या चिमूर तालुक्याचा क्रमवार घसरला या आधी कृषि अधिकारी यांनी आपल्या चिमूर तालुक्याचा अनुक्रमांक घसरू दिला नाही या असल्या कारणा मूळ अनेक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे आमदार साहेब या आधी जे अधिकारी कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते आम्हाला तेच अधिकारी हवे आमच्या आमदारांनी याकडे लक्ष केंद्रित करून या अधिकाऱ्यांला आल्या तिथं पाठवा साहेब आता आम्ही कामानिमित्त आफिस मध्ये येऊ येऊ थकलो साहेब चिमूर तालुक्यात येता जाता कोरोना नी मरण आल तरी चांगल परंतु उपाशी पोटी राहाची भीती वाटते कारण आपण आमच्याच विहिरीच्या बिला साठी अनेक दिवसांपासून टाळाटाळ करत आहे अशी आर्त हाक अनेक शेतकऱ्यांची असून माझ्या नावान बातमी नका लावू जी कारण ते आमच्या विहिरीचे बिल काढनार नाय या कोरोना मध्ये आमच कोणी भी आयकत नाय जी आमचा आमदार भी आता चिमूर ला भेटत नाय दोन वेळा गेलं होतं मी घरी पण दरवाजा बंद होता वापस आलो मी म्हणून या बातम्या मध्ये शेतकर्यांचे नाव प्रकाशित केल नाही आमदार साहेबानी या प्रकरनात लक्ष वेधून नवीन आलेला कृषी अधिकारी कसल्या प्रकारे काम करतो याची माहिती करून असल्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करून आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिक लोक प्रतिनिधींनी तात्काळ सोडवले पाहिजे. अशी मागणी चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close