ताज्या घडामोडी

मनस्वी तिराणिक हिचा गुणवंत विद्यार्थींनी म्हणून सत्कार

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

शालांत परिक्षेत ९१ % टक्केच्यावर उल्लेखनीय यश मिळवून तसेच राज्य शासनाच्या चित्रकला परिक्षेत प्रथम आलेली विद्यार्थ्यांनी मनस्वी परमानंद तिराणिक हिचा गुणवंत विद्यार्थ्यांनी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरच्या सभागृहात त्यांच्या पालंकासह बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता प्रा.डाँ. श्रीकांत मसराम, पोलीस निरीक्षक रोशन झरपाचे, डाँ. रविंद्र होळी हे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय ‘ दहावी, बारावी नंतर काय ‘ या विषयावर विद्यार्थ्यांना डाँ. श्रीकांत मसराम, प्रा.डाँ. निलेश मंगाम, प्रा.डाँ. भुषण नैताम, प्रशांत खाडे विभागीय वनधिकारी इत्यादी मान्यवरांनी उपस्थित असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close