पप्पुराज शेळके हरियाणाचे राज्यपाल बंडारू दतात्रय गारू हस्ते भारत सेवा रत्न परस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवी हक्क अभियानचे परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके यांना वालुरी फाऊंडेशन तेलंगणाच्या वतीने 2021 चा भारत सेवा रत्न लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार त्यानी गेली 22 वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हरियाणाचे राज्यपाल बंडारू दतात्रय गारू व न्यायमूर्ती मधुसुदन मलाकाजीरी यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र, शाल श्रीफळ हार गुच्छ व रोख रू.पाच हजार देऊन सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी पप्पुराज शेळके यांना एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रचा राज्यस्तरीय सेवा रत्न,मदत संस्था नागपूरचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजरत्न, राजवैद्य फाऊंडेशनचा राज्यस्तरीय सेवा गौरव, महाराष्ट्र मिडियाचा राज्यस्तरीय समता गौरव, बेटी फाॅउडेशन अंतरराष्ट्रीय सेवा रत्न, व शोसिएल वेलफेअर सोसायटीचा .. अदी पुरस्कार मिळालेले आहेत.
हा कार्यक्रम सुदरम विज्ञान केंद्र नालकुंटा हैद्राबाद येथे दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी संपन्न झाला.
हा पुरस्कार मिळाल्याबदल मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनयु दिल्लीचे प्रो डाॅ मिलिंद अवाड साहेब, मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादा साहेब क्षीरसागर, राज्य सचिव दिलीप भाऊ तावडे, राज्य उपाध्यक्ष दिलीप तुपे,राज्य उपाध्यक्ष धोंडीराम पाटोळे, राजेश भाऊ घोडे, मच्छिंद्रभाऊ गवाले, संतोष भिसे, शोशिएल मिडिया प्रमुख धोंडिबा हातागळे, रघुनाथ कसबे, संतोष लोखंडे,मारोती साठे, भिमाशंकर वैराळे, अनिल धुरंदेव, गणेश जोगदंड, दादाराव कांबळे,अजय हिवाळे, बाळासाहेब नवगिरे , रमेश घोडे,मुंजाभाऊ उफाडे संतोष करवंदे , देविदास कांबळे दिपक भालेराव, बिबिसेन शिंदे ,उतम झिंझुर्डे, राम वाघमारे, नितीन अडागळे, विष्णू मुजमुले, भारत बळवंते, अदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.