ताज्या घडामोडी

स्वराज महिला प्रभाग संघ नेरीचा वार्षिक अधिवेशन कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती चिमूर, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत महाजीविका अभियानाचे औचित्य साधून स्वराज महिला प्रभाग संघ नेरी _शिरपूर चे वार्षिक अधिवेशन दिनांक 15 जून 2022 रोज बुधवारला गुरुदेव सेवा मंडळ नेरी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती लताताई अरुण पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्षाताई अनंता सलाम( अध्यक्ष प्रभाग संघ नेरी) ह्या होत्या. या कार्यक्रमाचे संचालन सारिका बाहुरे तर आभार प्रदर्शन प्रीती डोंगरे यांनी केले.
ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उमेद अभियान अंतर्गत निर्माण करणे आल्याचे आहे. स्वयंसहाय्यता बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी ,उत्पादक कंपनी यांच्यामार्फत महिलांना शाश्वत उपजीविकेचे स्त्रोत व त्यांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाजीविका अभियान राबविण्यात येत आहे असे मनोगत उमेद चे तालुका अभियान कक्षाचे मेघदिप ब्राह्मणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी धावणे, संगीत खुर्ची ,रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, गीतगायन स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यात प्रभाग संघातील अनेक महिलांनी हिरिरीने भाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभागातील सर्व महिलांचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला तालुका अभियान चिमूरचे मेघदिप ब्राह्मणे, सारिका बाहुरे, बँक सखी, बँक कृषी, सखी ,पशु सखी, सर्व सीआरपी, सर्व बचत गटातील महिला उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close