ताज्या घडामोडी

मिलिंद विद्यालयात ‘शारदोत्सव-२०२३’ निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

माता पालकांनी मनोरंजनात्मक खेळात प्रत्यक्ष लुटला आनंद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

नाथ शिक्षण संस्था संचलित मिलिंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, परळी वै.येथे २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मिलिंद ‘शारदोत्सव २०२३’ चे प्रतिवर्षा प्रमाणे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने, संस्थेचे सहसचिव श्री.प्रदीपजी खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुलजी दुबे सर यांच्या सहकार्यातून यशस्वी आयोजन करण्यात आले.

५ वी ते १२ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी व त्यांचे माता पालक यांनी रॅम्पवाॅक फॅशन शो, बकेट बाॅल, संगीत खुर्ची,दांडिया या मनोरंजनात्मक खेळात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आनंद लुटला.

मिलिंद माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रतिवर्षी नवरात्रीचे औचित्य साधून ‘शारदोत्सव’ या सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येते. आपल्या पाल्यांचे कला गुण पाहण्यासाठी माता पालक तसेच मिलिंद माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.कदरकर सर, प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सौ.गित्ते मॅडम मंचावर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुलजी दुबे सर, प्राथमिक विभागाचे समन्वयक ओझा सर,शारदा विद्यामंदिर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वानखेडे मॅडम, शारदा विद्यामंदिर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धस मॅडम, शारदाबाई मेनकुदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.साखरे सर,मिलिंद प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.राठोड सर, मिलिंद ज्युनियर कॉलेज चे उप प्राचार्य श्री.शेख इरफान सर,पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर, पालक प्रतिनिधी सौ.अर्चना सुनील रोडे,सौ.
सुलक्षणा सुनील कांबळे,श्री.अर्जुन काशीनाथ आदाटे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री.धायगुडे सर यांनी केले. विद्यार्थीनी व माता पालकांना प्रमुख पाहुणे ॲड.सौ.गित्ते मॅडम व प्राचार्य श्री. दुबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री.कदरकर सर यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या संस्कारक्षम शिक्षणासोबत इतर शहशालेय उपक्रमांची माहीती उपस्थितांस दिली.

माता पालकांनी विविध मनोरंजनात्मक खेळांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थीनींनी विविध सांस्कृतिक गिते, लोकगीते, देशभक्तीपर गिते, दांडिया, गरभा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनी तसेच शाळा व ज्युनियर कॉलेज मधील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ सहशिक्षिका सौ.कोम्मावार मॅडम, सौ.बनसोडे मॅडम, श्री.व्हावळेसर यांनी केले, साऊंड सिस्टीमची जबाबदारी कला शिक्षक श्री.राजनाळे सर यांनी समर्थ पणे पार पाडली तर आभार कु.जोशी मॅडम यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते मनोरंजनात्मक खेळात पहिल्या तीन आलेल्या मातापालकांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close