ताज्या घडामोडी

मान्सून लांबल्याने शेतकरी हवालदिल


विजेच्या लंपडावाने बागायती पिके करपली

हादगाव ३३ के.व्हि ला लोड झेपेना.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते ३३के .व्हि.ला घर घर लागली असुन ते शेवटच्या घटका मोजत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे


हादगाव नखाते ३३के. व्हि. अंतर्गत येणारे रेणाखळी,वरखेड ,किन्होळा,डोंगरगाव, या गावांना होणारा विजेचा सप्लाय अत्यंत तोकड्या स्वरुपात मिळत असुन सतत कमी दाबाने लाईट असल्याने पंख्याचे पाते सुद्धा फिरत नाही,
साधा एलईडी बल्ब लागत नाही त्यात भरीस भर रेणाखळी गावात दिवसा अघोषित आणीबाणी प्रमाणे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुर्णपणे लोडशेडींगअसते. दिवसा लोड शेडिंग व रात्रीही लाईट नसल्याने वृद्ध व लहान लेकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे .शेतातली परिस्थिती तर याहुनही बिकट असुन थोडी हवा सुटली की लाईन फॉल्ट होऊन पाच सात तास लाईन येत नाही त्यासाठी गावातील तरुणांना रात्री बे रात्री बिघाड पाहत हादगाव पर्यंत शेतात अंधारात फिरून स्वतः बिघाड काढावे लागतात . या विषयी लाईनमन वा इंजिनीयर लक्ष देत नसून फोन सुद्धा उचलत नाहीत . मान्सून पुर्व करावयाचे दुरुस्ती कामे, पोलजवळील झाडे तोडण्याची कामे फक्त कागदावर होत असुन या तांत्रिक बाबी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे .हादगाव ३३के . व्हि. मध्ये सतत बिघाड होत असतो याकडे कोणी लक्ष देत नाही.
सध्या कडक उन्हाळा असुन लाईट अभावी शेतातील पिके करपून जात आहे
मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांनी सिंचनावर लागवड केलेली कपाशी उगवुन सुकत आहे.रेणाखळी हे गाव पाथरी तालुक्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठे असून रेनाखळी गावची लोकसंख्या साडेचार ते पाच हजार लोकसंख्या असलेले तालुक्यातील मोठे गाव असून पंचायत समिती गण असुन विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहेत. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रेनाखळी गावातील नागरिकांना व महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी व वीज या मूलभूत सुविधेसाठी आजही झगडावे लागत आहे . रेनाखळी गावच्या या समस्येमुळे नागरिक पार वैतागून गेले असून या समस्येकडे शासन व कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकरी हतबल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी रेनाखळी गावच्या वीज पाणी या मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याची गावकरी मागणी करत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close