ताज्या घडामोडी

खोब्रागडे परिवारात पसरली दुःखाची छाया

बल्हारपूरचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे यांची प्राणज्योत मालवली

अनेकांनी वाहिली दिवंगतास भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

विदर्भ मंडळ अधिकारी संघटना चंद्रपूर जिल्हा शाखेचे सक्रिय सदस्य , बल्हारपूर महसूल मंडळाचे विद्यमान मंडळ अधिकारी तथा सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे शंकर खोब्रागडे यांचे आज शनिवार दि.१२ऑगस्टला भद्रावती निवासस्थानी सकाळी ७वाजून ३०मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.विदर्भातील पटवारी विनोद खोब्रागडे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीची प्रत्यक्ष भेट घेत सहानुभूतीने चौकशी केली होती.सन १९९५ मध्ये शंकर खोब्रागडे पटवारी महसूल विभागात दाखल झाले होते. पटवारी म्हणून त्यांनी भद्रावती तालुक्यातील पटवारी दप्तरचा कार्यभार आरंभी सांभाळला होता.आपण व आपलं काम एव्हढेच क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांचे सामाजिक कार्यात ही योगदान तेव्हढेच महत्वाचे ठरले आहे.एक कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी म्हणून त्यांनी चंद्रपूर नजिकच्या बल्हारपूर महसूल विभागात आपली ओळख निर्माण केली होती. शांत स्वभाव असणारे स्व.शंकर खोब्रागडे यांचे सर्वसामान्य जनता , शेतकरी वर्ग ,अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रेमाचे संबंध जुळले होते.गेल्या चार महिन्यांपासून ते आजाराने होते त्यांचेवर चंद्रपूर व नागपूर येथे नियमित उपचार सुरू होता.वेळोवेळी डॉ.मंडळीं त्यांच्या प्रकृतीची जातीने काळजी घेत होते .पण कुठल्याही उपचाराला प्रतिसाद न देता त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त कानावर येताच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेकांनी आपला दुखवटा व्यक्त केला . त्यांच्या मागे दोन मुले पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.स्व.शंकर खोब्रागडे हे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं (व्हाॅट्सअप गृप) परिवारचे एक सदस्य होते.अनेकांची भावपूर्ण श्रद्धांजली! कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे यांच्या दुःखद निधना बाबत दुखवटा व्यक्त करीत मंडळ अधिकारी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार , नायब तहसिलदार सतिश साळवे , चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण झाडे , कोरपनाचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, प्रदीप जूमडे , अनिरुद्ध पिंपळापूरे, गजानन देऊळकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सोयाम , राजूरा उपविभागाचे पटवारी सुनिल रामटेके, विल्सन नांदेकर, सुभाष साळवे, निरंजन गोरे, बल्हारपूरचे महसूल कर्मचारी दिपक वडूळे , गजानन उपरे, अजय गाडगे ,सचिन पुणेकर पटवारी शंकर खरुले , अजय नौकरकर ,वरोरा महसूल विभागाचे अमोल आखाडे ,चंद्रपूर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी विनोद गणफाडे, नितिन पाटील, शैलेश धात्रक, सुनिल चांदेवार,मनिषा रायपूरे , संदेश करपे ,पटवारी विरेंद्र मडावी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक,वर्षा कोंगरे यांच्यासह अनेकांनी त्यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close