पोहरा ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर कायम
सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचे सिद्ध झालेच नाही.
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत पोहरा येथील सरपंच रामलाल जयगोपाल पाटणकर यांचे सरकारी जागेवर अतिक्रमण असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1),(ज-3)आणि 16 अन्वये सदस्य पदावरून अपात्र करावे याकरिता सामाजिक कार्यकर्ते गणेश बोडणकर पोहरा यांनी दाखल केलेल्या अर्जावर वर अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी 23 नोव्हेंबर रोजी खारीज केल्यामुळे ते सदस्य पदावर कायम आहेत 17 सदस्य ग्रामपंचायत पोहरा ची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2021 मध्ये पार पडली त्यात प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वच उमेदवार सरांनी नामनिर्देशनपत्रे परत घेतल्याने निवडणूक झालीच नाही सध्या 14 सदस्य कार्यरत आहेत प्रभाग क्रमांक 1मधून रामलाल जयगोपाल पाटणकर निवडून आले आणि सरपंच पदावर विराजमान झाले .त्यांचे वडील जयगोपाल पाटणकर यांच्या नावे मौजा पोहरा येथील सरकारी गट क्रमांक 38 वर 0.49आर पैकी 1575 चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून घर बांधकाम व मोकळ्या जागेत सांदवाडी असल्याचे तलाठी पोहरा यांच्याकडे असलेल्या अतिक्रमण पंजी वर गाव नमुना -1(ई) मध्ये नोंद असल्यामुळे व ते संयुक्त कुटुंबात राहत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोधनकर यांनी सरपंच रामलाल पाटणकर यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे, याकरिता अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे प्रकरण क्रमांक 49/अ-69/2020-21अन्वये 9 जुलै 2021 रोजी अर्ज दाखल केला होता .अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी दोन्ही बाजूचे साक्षीपुरावे, तलाठी पोहरा यांनी सादर केलेला मोका चौकशी अहवाल ,अर्जदार व गैरअर्जदार यांचे लेखी बयान व प्रकरण सोबत असलेले दस्तावेज अवलोकन करून सरपंच रामलाल पाटणकर यांचा अतिक्रमण संबंध दिसून येत नसल्याचा निर्वाळा दिला.