ताज्या घडामोडी

आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांच्या प्रयत्नाने भोगवटधारकांना कायमचा मालकी हक्क

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि 18/12/2021 रोजी पाथरी नगर परिषदेच्या वतिने आदरणीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब व गट नेते जूनेद भैय्या दुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या जागेवर राहत असलेल्या सर्व भोगवटधारकांना कायमंचा मालकी हक्क मिळाला आहे.


या कामासाठी मागील अनेक दिवसांपासून माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब व गट नेते जुनेद भैय्या दुराणी यांनी पाठपुरावा करून या सर्व लाभधारकांना न्याय मिळवून दिला.
या सर्व लाभार्थ्यांना घरकुल व ईतर सर्व शासनाच्या योजनेचा लाभ लवकरच नगर परिषदेच्या वतीने देण्यात येणार आहे .
या कामासाठी गट नेते जुनेद भैय्या दुराणी यांनी शासन स्तरावर अथक प्रयत्न करून लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिला त्या बद्दल नाईक गल्ली माळीवाडा येथील नवतरुण युवकांनी जुनेद भैय्या यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या वेळी – हन्नान मामा दुराणी उप अध्यक्ष, अलोक चौधरी नगरसेवक, गोविंद हारकळ बांधकाम सभापती,मुक्तार अली नगरसेवक, विठ्ठल राव रासवे नगरसेवक, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close