खासदार अशोकजी नेते यांची आरमोरी येथील मने कुटुंबीयांची घेतली सांत्वना भेट
प्रतिनिधिःरामचंद्र कामडी
आरमोरी तालुक्यातील आरमोरी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध दुर्गा माता देवस्थानचे अध्यक्ष,व माजी पं.स.सभापती तसेच आरमोरी ग्रा.प.चे माजी सरपंच स्व.श्री. चंद्रशेखरजी केशवराव मने यांचे दिंनाक.२६ ऑक्टोंबर ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
या संबंधितची माहीती खासदार अशोक नेते यांना मिळताच आज दिं ०५ नोव्हेंबर ०२३ रोज रविवार ला आरमोरी येथे मने कुटुंबीयांच्या परिवारांची भेट घेऊन सांत्वन केल स्व.चंद्रशेखरजी मने यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी करत त्यांच्या दुःखात सामील झाले.यावेळी त्यांचा मुलगा सागर मने बांधकाम सभापती न.प.आरमोरी यांना याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी दु:ख सावरण्याचं धीर दिला.
यावेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे सर,नगराध्यक्ष पवन नारनवरे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजपा जिल्हा सचिव नंदूभाऊ पेट्टेवार,ओंमकार मडावी,गणेश वनवे,शंकर सातव,युवा मोर्चाचे विकास पायडलवार महेश बांते,ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.