ताज्या घडामोडी

8 ऑगस्टपासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनी व हिराई सरस प्रदर्शनी

प्रतिनिधी :हेमंत बोरकर
मो.9403884389

चंद्रपूर कृषि विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्री करीता जिल्हास्तरीय सरस महोत्सव २०२२ चे आयोजन दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्हा परिषद , चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.
स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वस्तुंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्याचे प्रदर्शन व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये संबंधीत व्यवसायीक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.
वरील प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपेाळी, पुरणपोळी, झुनका भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळखत, गोमुत्र अर्क, चा समावेश आहे. या सोबतच स्वंयसहाय्यता समुहांचे खादयपदार्थाचे स्टॉल्स राहणार आहेत. यात पुरणपोळी, शाहाकारी तसेच मांसाहारी जेवण, झुणका भाकर, लांब पोळया आदीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. या माध्यमाने अशा महिलांना आर्थिक पाठबळ मिळावा हा देखील प्रदर्शनीचा उद्देश आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close