वाघाळा येथे आ.दुर्रानी यांची शालेय साहित्याने तुला

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील यांनी आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या वाढदिवसा निमित्य शुक्रवार १४ जुलै रोजी वाघाळा जि प शाळेत आ दुर्रानी यांची शालेय साहित्याने तुला करून आ दुर्रानी यांचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या.
या वेळी जि प शाळेच्या भव्य मैदानात झालेल्या कार्यक्रमा साठी सरपंच बंटी पाटील,शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष सुशिल घुंबरे, प्राथमिक चे अध्यक्ष सुरेश बोबडे,मुख्याध्यापक यु जी स्वामी,शेख अल्लाउद्दीन,शेख जाफर,सुनिल घुंबरे,संपती घुंबरे,पत्रकार किरण घुंबरे,प्रा शा मु अ सपकाळ,चव्हाण मॅडम,कासले,सुत्रावे,जाधव,पांचाळ,गुंजकर सचिन वाघ यांची उपस्थिती होती.
यावेळी आ दुर्रानी यांनी श्रीहरी कोटा येथुन चंद्रयान चे थेट प्रेक्षेपण विद्यार्थ्यां सोबत पाहिले या नंतर शाळा परिसरात वृक्षारोपण केले. या नंतर सरपंच बंटी पाटील यांनी आ दुर्रानी यांची शालेय साहित्याने तुला केली. या वेळी आ दुर्रानी यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल पुष्पहार घालून सत्कार केला. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थांना आ दुर्रानी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप केले. या वेळी सत्काराला उत्तर देतांना आ दुर्रानी यांनी वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील आणि ग्रामस्थांचे आभार मानत वृक्ष लागवड आणि शालेय साहित्य वाटून वाढ दिवस साजरा केल्या बद्दल आभार मानले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि आभार धावरे यांनी मानले या कार्यक्रमा साठी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.