योगनृत्य परीवाराची आज चंद्रपूरात जनजागृती रॅली !
मृग्धा खाडेंनीं केले रॅलीचे नेतृत्व !
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
महानगरपालिका चंद्रपूर अंतर्गत आयोजित स्वच्छता अभियानात सहभागी होत योग नृत्य परीवार आझाद गार्डन vटीम द्वारे आज मंगळवार दि.१५नोव्हेंबरला क्रांतीसुर्य बिर्सा मुंडा यांचे जयंतीचे औचित्य साधत गोविंद स्वामी मंदिर ते जोडदेऊळ चौक, गांधी चौक ते जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अशी एक सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते सदरहु रॅलीत महात्मा गांधीजी, राणी हिराई, गाडगे बाबा यांच्या सह अनेक आकर्षक व मनोवेधक देखावे साकारण्यात आले होते.
काही दिवसांपूर्विच कार्यभार सांभाळणारे महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून या वेळी उपस्थितीतांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी केले. गोपाल मुंदडा यांनी स्वच्छता आणि निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश देत या वेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
संघ प्रमुख मुग्धा खांडे यांनी स्वच्छते सोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला तदवतंच मनपा प्रशासनाचे आभार मानले.तर योग नृत्य परीवारचे स्वच्छता दुत मंगेश खोब्रागडे यांनी आभार प्रदर्शन केले.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सह डॉ .अमोल शेरकी व भूपेश गोठे यांनी निघालेल्या लक्षवेधक रॅलीत आपला सहभाग नोंदविला . आयोजित उपरोक्त रॅलीची सांगता मध्यवर्ती कारागृह येथील शहीद बाबुरावजी शेडमाके स्मारक परिसरातील साफसफाई करुन करण्यात आली.या रॅलीत योग नृत्य आझाद गार्डन टीमचे जेष्ठ पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद कामनवार, संतोष पिंपळकर, आकाश घोडमारे, सूरज घोडमारे, मीना निखारे, पुनम पिसे, रंजना मोडक, रवी निखारे, मंगेश खोब्रागडे, साहिल चौधरी, अलका गुप्ता, विकास गुप्ता, अशोक उईके, बाळकृष्ण माणूसमारे, सारीना शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.
रॅलीचे नेतृत्व गोपाल मुंदडा यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील सुपरिचित सामाजिक महिला कार्यकर्त्या मृग्धा तरुण खांडे यांनी केले .