कवटाराम येथे अतिक्रण शेत जमिनीची मोजनिला सुरूवात
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी, अहेरी तालुका व येरमनार ग्रामपंचयत अंतर्गत येणारे मौजा – कवटाराम गावामध्ये सण २००५ पुर्वी अतिक्रण केलेली शेतकऱ्यांचे शेत जमिनीची मोजणिला सुरू करण्यात आले आहे.
यावेळी मौजा – कवटाराम गावाचे २० अतिक्रण शेतकऱ्यांचे शेत जमिनीची मोजणी करण्यात आले.
सण २००५ पुर्वी अतिक्रण केलेली सर्व शेत जमीन मोजणी करण्यासाठी अहेरी विधान सभेचे आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकर ) यांनी शासन स्तरावर पाटपुरवठा करुन, अतिक्राण शेत जमीन मोजणी करण्यासाठी लागणारे सर्व आदेश हे सबंधित विभागांकडून काढण्यात आले आहे. व त्यानतंर सगळीकडे शेतकऱ्यांच्या शेत जमीनीची मोजणीला प्रत्येक्षात सुरू झालेला आहे.
यावेळी मौजा – कवटाराम गावाचा शेत जमीन मोजणी करतांना कवटाराम चे वन हक्क समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण आत्राम, सचिव श्री सुधीर आत्राम, वनपाल श्री येडलावार साहेब, वनरक्षक कू. मामिता गावळ मॅडम, कोतवाल श्री मनोज गावडे, गाव पाटील श्री दामा आत्राम, श्री सतीश आत्राम, साधू वेलादी, भीमा आत्राम, चैतु कुळमेथे, डोबि आत्राम, बंडू आत्राम, रुपेश आत्राम, वंजा आत्राम व कवटाराम गावातील शेतकरी उपस्थित होते.