ताज्या घडामोडी

राजकीय हितापोटी १२ संचालकांनी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केला विरोध

घडामोडीनंतर पाथरी बाजार समीतीत राजकीय संघर्षात शेतकरी हिताची होतेय माती.

सोमवारी गणपुर्ती अभावी तहकूब झालेली सभा गुरूवारी झाली सपन्न.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्तम काम करणारे पाथरी बाजार समीतीचे संचालक मंडळाला राजकीय घडामोडीनंतर संघर्षाची झालर लागली.सोमवारी गणपुर्ती अभावी तहकूब झालेली संचालक मंडळाची सभा गुरूवारी झाली खरी पण राजकीय हितापोटी माजी आ.बाबाजाणी दुर्राणी गटाच्या १२ संचालकांनी नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केद्र सुरु करण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयालाच विरोध केला.खरेतरं हा प्रकार बाजार समीती कायद्याची एकप्रकारे ‘थट्टा’ च म्हणावी लागेल. शेतकरी अशा संचालक मंडळाकडून काय आदर्श घेतील असा प्रश्न या बैठकीनंतर पुढे आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदाने स्थानिक राजकारण ढवळून निघाले.पाथरीत बदलत्या राजकीय स्थितीत पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी माजी आ.बाबाजाणी दुर्राणी यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर विश्वास ठेवून आपली भुमीका कायम ठेवली.पण हा प्रकार माजी आ.दुर्राणी यांना जिव्हारी लागला.या राजकीय घडामोडीनंतर सोमवारी पहिल्यांदा बाजार समीतीची सभा हेतूपुरस्पर गणपुर्ती अभावी तहकूब झाली.त्यानंतर गुरुवारी १२ सप्टेंबर दुपारी १ वा.सभागृहात सभापती अनिल नखाते यांचे अध्यक्षतेखाली सभा घेतली.यावेळी सभापती व विरोधी गटाचे ५ असे ६ तर आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे गटाचे १२ पैकी १२ असे १८ संचालक उपस्थिती होते.
यावेळी सभापती अनिल नखाते यांनी शासनाने नाफेड मार्फत बाजार समीतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी जिल्हा पणण अधिकारी यांचेकडे प्रस्ताव देऊन मंजुरी घ्यावी.जेणेकरून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ असा शासनाचा हमी भाव मिळेल कारण खुल्या बाजारात असा भाव मिळणे मुश्किल आहे. या प्रस्तावास संचालक प्रभाकर शिंदे यांनी अनुमोदन दिले.परंतू मा.आ.दुर्राणी गटाच्या १२ संचालकांनी विरोध केला.
याशिवाय सभापती नखाते यांनी शेतमाल तारण योजना अंतर्गत कृषी पणन मंडळाकडून १० लाख अँग्रीम घेऊन ते शेतकऱ्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.यास संचालक एकनाथ घांडगे यांनी अनुमोदन दिले यालाही मा.आ.दुर्राणी गटाच्या १२ संचालकांनी विरोध केला.यानंतर बाजार समीती अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार सप्टेंबर अखेर सर्वसाधारण सभा घेण बंधनकारक आहे. हि सभा ३० सप्टेंबर रोजी घेण्यात यावी असा प्रस्ताव सभापती नखाते यांनी मांडला.यास अशोकराव गिराम यांनी अनुमोदन दिले.परंतु मा. आ.दुर्राणी गटाच्या १२ संचालकांनी याला विरोध केला त्यामुळे सर्वसाधारण सभा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बैठकीत सभापती अनिल नखाते,संचालक ,प्रभाकर शिंदे,एकनाथ घांडगे,अशोकराव गिराम,संतोष गलबे,किरण टाकळकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाला संमती दिली.पण माजी आ.दुर्राणी यांच्या १२ संचालकांनी विरोध केल्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय तुर्त होऊ शकले नाही .

राजकीय घडामोडीनंतर असे प्रकार होत राहतील . पण समाजकारण आणि सामाजिक बांधीलकीतून शेतकरी हिताच्या निर्णयाला खोडा घालतील असे वाटले नव्हते.
अनिल नखाते
सभापती, कृऊबास पाथरी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close