आशा, संकल्प आणि नवचैतन्याने २०२६ चे स्वागत; २०२५ ला भावनिक निरोप

तालुका प्रतिनिधी:विश्वनाथ मस्के
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस २०२५ हे वर्ष निरोप घेत असून नववर्ष २०२६ चे सर्वत्र उत्साह, आशा व नवचैतन्याने स्वागत करण्यात येत आहे. गेलेले वर्ष समाजासाठी अनेक आव्हाने, अनुभव आणि शिकवण देणारे ठरले. या कालावधीत शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
भिसी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये व विविध सामाजिक संस्थांमध्ये नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचे कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. नागरिकांनी जुन्या वर्षातील आठवणींना निरोप देत नव्या संकल्पांसह पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नववर्ष २०२६ हे सुख-समृद्धी, आरोग्य, शांतता आणि विकास घेऊन येवो, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून नववर्ष साजरे करताना शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुने अनुभव आणि नव्या अपेक्षा यांचा संगम साधत समाज अधिक सकारात्मक, प्रगत आणि एकसंध होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.









