ताज्या घडामोडी
विट्ठलवाडा येथील पल्स पोलीयो महाभियानाचा सरपंच अंकुर मल्लेलवार यांच्या हस्ते शुभारंभ

117 बालकाना देण्यात आला पल्स पोलीयोचा डोज
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे
गोंडपिपरी
0 ते 5 वयोगटातील बालकाचे पल्स पोलियो महाअभियानाचे आयोजन
अंगणवाडी क्रमांक दोन आणि आरोग्य केंद्र विठ्ठलवाडा येथे पार पडले.
विट्ठलवाडा ग्रामपंचायतिचे सरपंच अंकुर मलेलवार यांच्या हस्ते पल्स पोलियो महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यात गावातील 0 ते 5 वयोगटातील एकूण 117 बालकांना पल्स पोलियोचा डोज देण्यात आला.
दो बुंद जिदगी की अशी धारणा ठेवुन आरोग्य केंद्रात 32 तर अंगणवाडी केंद्र प्रभाग दोन मध्ये 85 बालकांना पोलियोचा डोज पाजण्यात आला.
यावेळी विठ्ठलवाडा ग्रामपंचायतिचे सरपंच अंकुर मल्लेलवार,प्राची वैद्य मॅडम सामुदायिक आरोग्य अधिकारी ,
आरोग्य सेवक पिंपळशेंडे,
अंगणवाडी सेविका पिदुरकर, बुध्दक्रांती चांदेकर,आशा वर्कर मडावी ,पौर्णिमा कुकुडकर यांची उपस्थिती होती.