ताज्या घडामोडी

कोरोना लसीकरणाविरोधात पाथरी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना बी.एम.पी चे निवेदन

बहुजन मुक्ती पार्टी चे ३६ जिल्हयात एकच वेळेस निवेदन देण्यात आले.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सरकार कोरोना लसीकरण सक्तीचे आदेश काढत असल्यामुळे संविधानिक मुल्याचे हनन होत असल्यामुळे बेकायदा केलेली लसीकरणाची सक्ती व नागरीकांनावरती लादले गेलेले निर्बध राज्यसकारने तात्काळ मागे घ्यावेत यासाठी बहुजन मुक्ती पार्टी पाच टप्यात अंदोलन करत असून आज त्यातील पहीला टप्पा पुर्ण केला.
एकीकडे लस बंधनकारक नाही असे न्यायालयाचे आदेश असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी लसीकरण सक्तीचे आदेश काढत आहेत त्यामुळे
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जो लसीकरण सक्ती विरोधात अंदोलनाचा पहीला टप्पा होता त्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहशिलदार यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री, मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्याचा होता. या पहील्या टप्पयात आज पाथरी येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पाथरी तहसीलदार यांना निवेदन देऊन काही सविस्तर मागण्या केल्या आहे.
१. लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना होणार नाही किंवा इतर आजार उद्वभवणार नाही अशी तज्ञानी तपासणी केली असेल तो अहवाल द्यावा.
२. सदर कोरोना लसीमध्ये कोणते घटक आहेत ते लिखित स्वरूपात द्यावे.
३. कोवीड आजार अस्तित्वात असल्याचे वैज्ञानिक माहीती असेल ते लिखित स्वरुपातील पुरावे द्यावेत.
४. लाँकडाऊन केल्यास कोरोना होणार नाही त्यासाठी काही वैज्ञानिक पुरावा असेल तर तो द्यावा.
५. कोरोनाचे निदान करण्यासाठी वाफरण्यात येणारी आरटीपीसीआर टेस्ट किट कितपत खात्रीशीर आहे ?ती किट विषाणू शोधू शकते का ?
६. कोरोना लस कोरोना रोखण्यासाठी सक्षम आहे का ? याबाबत सविस्तर माहीती द्यावी.
७. कोरोना लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना होणार नाही तसेच लस घेतल्यास त्यांना लसीमुळे इतर आजराची लागण होणार नाही याबबतचे हमीपत्र प्रशासनाकडून लिखित स्वरुपात देण्यात यावे.
८. एखाद्या व्यक्तीने घस घेऊन तो दगावला तर त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सहायत्ता निधी देण्याचे हमीपत्र महाराष्ट्र सरकारने द्यावे.
९. भारतीय घटनेच्या कलम २१ नुसार भारतीय नागरीकांना इलाज करून घेणे अथवा न करून घेणे यासंदर्भात पुर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाऊ शकत नाही तरीपण लसीकरण सक्ती करणारे आदेश जिल्हाधिकारी कोणत्या आधारावर काढत आहे हे लिखित द्यावे.
१०. जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचे आदेश काढणे म्हणजे संविधानाच्या कलम २१ चे सरळसरळ उल्लंघन आहे, या उल्लंघन केलेल्या अधिका-यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
अशा मागण्या असलेले निवेदन आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पाथरी तहसीलदार यांना देण्यात आले. त्यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पाथरी तालुका अध्यक्ष लहूदादा गालफाडे, लहुजी क्रांती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विकास पाथरीकर,बहुजन मुक्ती पार्टी चे शहर अध्यक्ष नवनाथ कांबळे,बळीराम कांबळे,राजू हतागळे,अनिल कांबळे,महादेव कांबळे,दर्शन कांबळे,गणेश राऊत हे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close