पुणे येथील पोलीस मिञ परिवार समन्वय समिती ची बैठक संपन्न

प्रतिनिधी:अहमद अन्सारी
पोलीस मित्र परीवार समन्वय समिती
संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.उमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य सचिव मा.विनोद पत्रे सर,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार मा.सुभाष दादा सोळंके,महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली
अॅड.ज्योती विरकर पुणे यांच्या निवासस्थानी समितीची आढावा बौठकी मध्ये पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांचे ओळखपञ सुभाषजी सोंळके यांच्या अध्यक्षतेखाली व माधुरीताई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात आले.

या बैठकी मध्ये समितीच्या ध्येय-धोरणाविषयी,पुढिल काळात समितीची वाटचाल,समितीचे कार्यालय व ईतर महत्वपूर्ण विषयांवर
मा.सुभाषदादा यांनी व मा.माधुरी गुजराथी मॅडम नी चर्चा करुन सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी अॅड.सारीका झुरूंगे मॅडम,वर्षा रनशुर मॅडम,किमया ढेकणे मॅडम,मारुती कुदळे सर, गायकवाड सर,रनशुर सर,यांनी समितीची कार्यप्रणाली पाहुन पुढिल काळात समिती मध्ये काम करण्याची समितीचे मुख्य सल्लागार व महिला मुख्य प्रमुख यांच्या पुढे ईच्छा दर्शविली,वर्षा रनशुर मॅम व सरांनी मुलिंन साठी सेल्फडिफेन्सचे प्रात्याक्षीक शाळा काॅलेज मध्ये पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मार्फत घेण्याबाबतही सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली.
अॅड.ज्योती विरकर मॅडम यांनी जास्तीत जास्त महिलांना, मुल-मुलिंना,पुरुषांना समितीत समाविष्ट करण्याकरिता सर्वांची सहकार्याची व मदतीची भुमिका असावी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.मा.मारुती कुदळे सर,मा.रनशुर सर, मा.गायकवाड सर,
सौ.वर्षा रनशुर, सौ.अॅड.सारीका झूरूंगे,
सौ.किमया ढेकणे
यांनी बैठकीला उपस्थितीत राहुन सहकार्य व मदत केली.