सलून व्यावसायिकाची गळफास लावून आत्महत्या

ग्रामीण प्रतिनिधी: राहुल गहुकर नेरी
चिमूर तालुक्यातील नेरी येथील सलून व्यवसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दी. 6/6/2023 ला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीच आली अनिल शालिकराव बारसगडे वय 38 वर्ष यांनी नेरी ग्रामपंचायत समोर सात वर्षांपासून सलुनचा व्यवसाय करीत होते. ते नेरी येथील मेंढुलकर परिवारात जावई होते त्यांचे मुळगाव निमगाव जिल्हा गडचिरोली येथील होते .
ते सात वर्षापासून फुले नगरात स्वतःचे घर बांधून परीवरासहित राहत होते.
दुकान सुरू असतांनि त्याचा मुलगा येवून बधितले असता अनिल बरसागडे याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले घटनेची वार्ता पसरताच लोकांची गर्दी उसळली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणी साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला .
पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे त्याचे परिवारात पत्नी , दोन मुले व बराच मोठा आप्ता परिवार आहे पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.